Tuesday, November 28, 2017

Digilocker


डिजिलॉकर - हि सुविधा भारत सरकार ने तुमचे महत्वाचे कागदपत्रे डिजिटल स्वरूपात साठवण्यासाठी दिलेला लॉकर आहे . यामध्ये तुम्ही तुमची महत्वाची डॉक्यूमेंट्स साठवू शकता . जेणे करून तुम्ही हि कागदपत्रे प्रत्येक वेळी प्रत्यक्ष बाळगण्याची गरज नाही. जसे कि आधार कार्ड , ड्रायविंग लायसेन्स , गाडीचे आर सी बुक ,अजून बरेच शासकीय कागदपत्रे (भविष्यात ).. तुमच्या पैकी काही जणांना हा प्रश्न पडेल कि मी कागदपत्रांचे फोटो किंवा स्कॅन कॉपी मोबाईल मध्ये ठेवतो , मग कशाला हे वापरू . याचे वेगळेपण हे आहे कि यात आधार कार्ड किंवा लायसेन्स , मार्कशीट्स हे स्वतः अपलोड न करता issue करणाऱ्या संस्था न कडून पूल करता येतात . उदा. तुमचे मार्कशीट्स डायरेक्ट बोर्डाच्या site वरून पूल करता येतात .तुमचं आधार कार्ड लिंक करून या सुविधा वापरता येतात . RTO कडून पूल केलेले लायसेन्स ,हे तुम्ही काढलेल्या फोटो पेक्षा अधिक वैध मानले जाईल . भविष्यात कुठे हि तुम्हाला खरी कागदपत्रे लागणार नाहीत आणि ती DigiLocker वरून शेअर केली जातील . सध्या marksheets, driving licence ,rc book पूल करता येतात .आधार कार्ड आणि LPG subscription vouchers आपोआप यात येतात . जी डॉक्यूमेंट्स स्वतः तुम्ही अपलोड केली आहेत ती पण येथे ठेवता येतात आणि eSign करून ठेवू शकता,जी कि self attested documents मानली जातील आणि येणाऱ्या काळात फक्त तुम्हाला त्याची लिंक शेअर करावी लागेल कारण requestor आणि Issuer दोघे यावर रजिस्टर असतील . चला तर मग DigiLocker वापरूया .हे Google play store वर availableआहे

No comments:

Post a Comment