Tuesday, November 28, 2017

Digilocker


डिजिलॉकर - हि सुविधा भारत सरकार ने तुमचे महत्वाचे कागदपत्रे डिजिटल स्वरूपात साठवण्यासाठी दिलेला लॉकर आहे . यामध्ये तुम्ही तुमची महत्वाची डॉक्यूमेंट्स साठवू शकता . जेणे करून तुम्ही हि कागदपत्रे प्रत्येक वेळी प्रत्यक्ष बाळगण्याची गरज नाही. जसे कि आधार कार्ड , ड्रायविंग लायसेन्स , गाडीचे आर सी बुक ,अजून बरेच शासकीय कागदपत्रे (भविष्यात ).. तुमच्या पैकी काही जणांना हा प्रश्न पडेल कि मी कागदपत्रांचे फोटो किंवा स्कॅन कॉपी मोबाईल मध्ये ठेवतो , मग कशाला हे वापरू . याचे वेगळेपण हे आहे कि यात आधार कार्ड किंवा लायसेन्स , मार्कशीट्स हे स्वतः अपलोड न करता issue करणाऱ्या संस्था न कडून पूल करता येतात . उदा. तुमचे मार्कशीट्स डायरेक्ट बोर्डाच्या site वरून पूल करता येतात .तुमचं आधार कार्ड लिंक करून या सुविधा वापरता येतात . RTO कडून पूल केलेले लायसेन्स ,हे तुम्ही काढलेल्या फोटो पेक्षा अधिक वैध मानले जाईल . भविष्यात कुठे हि तुम्हाला खरी कागदपत्रे लागणार नाहीत आणि ती DigiLocker वरून शेअर केली जातील . सध्या marksheets, driving licence ,rc book पूल करता येतात .आधार कार्ड आणि LPG subscription vouchers आपोआप यात येतात . जी डॉक्यूमेंट्स स्वतः तुम्ही अपलोड केली आहेत ती पण येथे ठेवता येतात आणि eSign करून ठेवू शकता,जी कि self attested documents मानली जातील आणि येणाऱ्या काळात फक्त तुम्हाला त्याची लिंक शेअर करावी लागेल कारण requestor आणि Issuer दोघे यावर रजिस्टर असतील . चला तर मग DigiLocker वापरूया .हे Google play store वर availableआहे

Thursday, January 14, 2010

स्टिक फास्ट--upay


काही दिवसापूर्वी चुकून माझ्या हातावर stick फास्ट उडाले आणि सर्व बोटे एक्मेकाना चिकटून बसली. बोटे इतकी घट्ट चिकटली होती की ओढली किंवा कापली असती तर बोटाना major damage होण्याची शक्यता होती. मी पेट्रोल , केरोसीन , nail paint remover मधे try करुन पाहिले पण काहीच उपयोग झाला नहींशेवटी मी डॉक्टर कड़े जायचे ठरवले .डॉक्टर पण म्हणाले कट करने difficult आहे. शेवटी मी माझ्या मोठ्या भावाला फ़ोन केला .त्याने सोपी आईडिया सांगितलीत्याने संगीताल्याप्रमाने में माझा हात गरम पाण्यात बुडवून ठेवला . आणि १० मिनिटात बोटे मोक़ळी झाली.:

Wednesday, January 13, 2010

माझी 'संक्रांत'

आज पहाटेच संक्रांतीसाठी बायको ला घरी बसवून दिले . मला सुट्टी नसल्याने मी परत येउन झोपलो .झोपताना विचार केला की आज आपलेच राज्य आहे ,निवांत आवरून ऑफिस ला जाऊ . ८ वाजता उठलो , पाणी तापवयाला ठेवले .दूध तापवयाला ठेउन पेपर वाचावा असे ठरवले. पेपर वाचता वाचता पिशवी वाकडी कापल्याने थोड़े दूध खाली ओट्यावर सांडले .ते पुसून घडयाळ पाहिले साडे आठ वाजत आले होते .ती नसल्याने व्यायामाला आपोआपच दांडी मारली गेली . दाढ़ी उरकली ,अजुन अंघोळ बाकि होती.अंघोळ करता करता अचानक लक्षात आले की आज कपडे सुध्धा आपल्यालाच धूवायचे आहेत. हे काम म्हणजे एकदम आपल्याला जन्मठेप असल्यासारखे वाटते. अविवाहित लोकाना (मुलांना ) हे नक्कीच पटले असेल.कसेबसे ते काम हातावेगळे केल्यावर , सौभाग्यवतीची सूचना आठवली "कपडे बाहेर वाळायला टाका".देव पूजा करून घेतली .एव्हाना घड्याळाने असहकार पुकारला होता . कालचा भात परतायला सुरुवात केलीपरतता परतता तो थोडा गँस वर सांडला . तेआवरताना नाश्ता बाहेर केला असता तर ब्ररे झाले असते असा विचार मानत येउन गेला . भांडे घसयाचा त्रास नको म्हणुन भात कढईतच खाल्ला.तो तोंडातच फिरत होता. पण सगळा तोंडात भरून घेतला . अजुन चहा करायचा बाकि होता .कसा बसा केलेला चहा छान(?) झाला होता. पिताना झाले एकदाचे असे वाटले . अजुन कपडे इस्त्री ,डबा भरणे, कालच्या भाकरी गाईला घालणे ही कामे बाकी होती.अजुन बरेच काही ती सांगुन गेली होती ते आठवायला लागले . चहाची पावडर कुठे टाका की टाकु नका असे काहीतरी सांगितले होते. आठवत नसल्याने सर्व भांडे तसेच बेसीन मधे भिजवत ठेउन, गाईला भाकरी घातल्या .आता ड्रेस ला इस्त्री करने अशक्य होते. कालचाच ड्रेस घालून,सगळ्या वस्तु शोधल्या , कपड्यांच्या घडया घातल्या . कसा बसा ऑफिस ला सट्कलो . आज खरच माझ्यावर संक्रांत आली होती .