Wednesday, January 13, 2010

माझी 'संक्रांत'

आज पहाटेच संक्रांतीसाठी बायको ला घरी बसवून दिले . मला सुट्टी नसल्याने मी परत येउन झोपलो .झोपताना विचार केला की आज आपलेच राज्य आहे ,निवांत आवरून ऑफिस ला जाऊ . ८ वाजता उठलो , पाणी तापवयाला ठेवले .दूध तापवयाला ठेउन पेपर वाचावा असे ठरवले. पेपर वाचता वाचता पिशवी वाकडी कापल्याने थोड़े दूध खाली ओट्यावर सांडले .ते पुसून घडयाळ पाहिले साडे आठ वाजत आले होते .ती नसल्याने व्यायामाला आपोआपच दांडी मारली गेली . दाढ़ी उरकली ,अजुन अंघोळ बाकि होती.अंघोळ करता करता अचानक लक्षात आले की आज कपडे सुध्धा आपल्यालाच धूवायचे आहेत. हे काम म्हणजे एकदम आपल्याला जन्मठेप असल्यासारखे वाटते. अविवाहित लोकाना (मुलांना ) हे नक्कीच पटले असेल.कसेबसे ते काम हातावेगळे केल्यावर , सौभाग्यवतीची सूचना आठवली "कपडे बाहेर वाळायला टाका".देव पूजा करून घेतली .एव्हाना घड्याळाने असहकार पुकारला होता . कालचा भात परतायला सुरुवात केलीपरतता परतता तो थोडा गँस वर सांडला . तेआवरताना नाश्ता बाहेर केला असता तर ब्ररे झाले असते असा विचार मानत येउन गेला . भांडे घसयाचा त्रास नको म्हणुन भात कढईतच खाल्ला.तो तोंडातच फिरत होता. पण सगळा तोंडात भरून घेतला . अजुन चहा करायचा बाकि होता .कसा बसा केलेला चहा छान(?) झाला होता. पिताना झाले एकदाचे असे वाटले . अजुन कपडे इस्त्री ,डबा भरणे, कालच्या भाकरी गाईला घालणे ही कामे बाकी होती.अजुन बरेच काही ती सांगुन गेली होती ते आठवायला लागले . चहाची पावडर कुठे टाका की टाकु नका असे काहीतरी सांगितले होते. आठवत नसल्याने सर्व भांडे तसेच बेसीन मधे भिजवत ठेउन, गाईला भाकरी घातल्या .आता ड्रेस ला इस्त्री करने अशक्य होते. कालचाच ड्रेस घालून,सगळ्या वस्तु शोधल्या , कपड्यांच्या घडया घातल्या . कसा बसा ऑफिस ला सट्कलो . आज खरच माझ्यावर संक्रांत आली होती .

8 comments:

  1. मस्त लिहिलंय मित्रा... माझ लग्न नाही अजून झाल, पण तुझी अवस्था तर डोळ्या समोर नक्कीच आली होती ..
    आणि लग्नानंतरच्या प्रवासाच्या एक छोटाशा अनुभवला चाखायला मिळालं

    ReplyDelete
  2. 1 no. rahul!!!!!!!!!!
    Pan tuzihi evadhi vait halat hoil lagnanantar asa vatala navta!!!!!!!
    :-)

    ReplyDelete
  3. pahili Sankrant far kahi shikaun geli vatat बायको kiti divasanni ali re parat nahi mhanaje andaj ala asata tujhe kay zale asel ti yeoo paryant

    ReplyDelete
  4. prathamach ya blogvar ale. "mpsc" changali mahiti detoy."sankrati"baddal"ashi sankkrant
    pratyek purushachya jivnat yavi hi sadichha ...........

    ReplyDelete
  5. Vahini, Rahul la sodun jat naka jau ho.......
    Amhala tension yete...Bichara kay kay karnar...

    ReplyDelete